Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे पर्यावरण दिन साजरा, वृक्षारोपण व सिडबालचे वाटप

मूल येथे पर्यावरण दिन साजरा , वृक्षारोपण व सिडबालचे वाटप

मुल प्रतिनिधी

वनविभाग चंद्रपूर वनपरिक्षेत्र कार्यालय चीचपल्ली आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा मुल व पर्यावरण प्रेमी संजीवन संस्था, अ.भा. ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मुल  इकोपार्क येथील वनराईच्या सानिध्यात ५ जून २०२२ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे आयोजन करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांच्या नेतृत्वात सर्व सहभागी संस्थांचे अध्यक्ष  पदाधिकारी यांच्याहस्ते मुल येथील इको पार्क परिसरात विविध प्रकारच्या फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.   

वृक्ष संवर्धन व पर्यावरनाचे महत्व याविषयावर नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे तालुका अध्यक्ष  मीरा शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे, अध्यक्षस्थानी असलेल्या जिल्हा उपाध्यक्ष अल्का राजमलवार यांनी मानव व वन्यप्राणी यांच्यासाठी वृक्षाचे महत्व यावर उपयुक्त  माहिती दिली. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्षाचीही संख्या वाढली पाहिजे या उदात्त हेतूने चंद्रपूर वनविभाग चीचपल्ली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांनी जागतिक पर्यावरण दिनात सहभागी झालेल्या सर्व संस्थांच्या पदाधिकारी सदस्य यांना  एक व्यक्ती -एक झाड लावून पर्यावरणाचे रक्षण करावे असे आव्हान करुन आपल्या हस्ते सिडबालचे वाटप करण्यात आले.नागपुर विभाग अध्यक्षा यांनी पामरोप भेट देऊन वेलमे मॅडम यांचे आभार मानले.वेळोवेळी वनविभागातर्फे मदतीचे आश्वासन दिले.

याप्रसंगी नेफडो नागपूर विभाग अध्यक्षा रत्ना चौधरी, संजीवनी संस्थेचे अध्यक्ष पर्यावरण प्रेमी उमेश झिरे, ग्राहक पंचायतचे अध्यक्ष दीपक देशपांडे, मुल क्षेत्र सहाय्यक प्रशांत खणके, ना.वि. सहसचिव नेफडो गुरुदास चौधरी, उपाध्यक्षा ललिता मुस्कावार, सचिव कविता मोहूर्ले, जिल्हा अध्यक्षा सुषमा कुंटावार, चंद्रपूर जिल्हा युवा उपाध्यक्ष राकेश ठाकरे,स्मिता बांडगे जिल्हा संघटिका,मुल तालुका युवा अध्यक्षा कुमुदिनी भोयर, तालुका युवा सचिव राखिता नागोशे, तालुका संघटिका सुनीता खोब्रागडे, नंदा शेंडे,  देवगडे सर, खोब्रागडे सर,शहर संघटिका पोकळे मॅडम,आडेपवार मॅडम यांचेसह संजीवनी संस्थेचे सर्व पदाधिकारी,ग्राहक पंचायतचे पदाधिकारी सदस्य, नेफडोचे अनेक तालुका संघटिका, व चीचपल्ली वनविभागाचे सर्व अधिकारी ,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन क्षेत्र सहाय्यक घागरगुंडे यांनी केले. अल्पोपहार व चहा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments