Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

अवैध वृक्ष तोड करणाऱ्या लाईट मेटल कंपनीवर गुन्हा दाखल,चिचपल्ली वनविभागाची कारवाई मूलच्या गुड मॉर्निंग ग्रुपने केला होता वृक्षतोडीला विरोध

अवैध वृक्ष तोड करणाऱ्या लाईट मेटल कंपनीवर गुन्हा दाखल,चिचपल्ली  वनविभागाची कारवाई
मूलच्या गुड मॉर्निंग ग्रुपने केला होता वृक्षतोडीला विरोध

मूल (प्रतिनिधी)

वनविभागाची परवानगी न घेता वृक्षतोड केल्याप्रकरणीं चिचपल्ली वनविभागाने मूल येथे काम करीत असलेल्या सुरजागड येथील लाईट मेटल अॅन्ड कंपनीवर वनगुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणी मूल येथे खळबळ उडाली आहे.

मूल येथील रेल्वे परिसरात माल धक्काचे काम मागील काही दिवसांपासुन सुरु आहे, याच परिसरातील मौजा विहीरगांव सर्व्हे नं. 216 मध्ये मोठया प्रमाणावर साग आणि इतर किसमचे मोठे वृक्ष आहे, सदर वृक्ष माल धक्काचे काम करीत असताना अडचण होत असल्याने कंपनीने वनविभागाची परवानगी न घेताच वृक्ष तोड केलेले आहे. 

विशेष म्हणजे या वृक्षतोडीला मुल येथील गुड मॉर्निंग ग्रुपने विरोध केला होता. तसे निवेदनही मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर यांना देण्यात आले होते. मूलच्या एकमेव कर्मवीर मैदानालगत होणाऱ्या या माल धक्क्याला दिवसेंदिवस मूलवासीयांचा विरोध वाढत आहे. या माल धक्क्याला स्थलांतरित न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा गुड मॉर्निंग ग्रुपने आणि मूलवासी यांनी दिला आहे.


मूल येथील रेल्वे परिसरात माल धक्का मागील काही दिवसांपासुन सुरु आहे, याच परिसरातील मौजा विहीरगांव सर्व्हे नं. 216 मध्ये मोठया प्रमाणावर साग आणि इतर किसमचे मोठे वृक्ष आहे, सदर वृक्ष माल धक्काचे काम करीत असताना अडचण होत असल्याने कंपनीने वनविभागाची परवानगी न घेताच वृक्ष तोड केलेले आहे. सदर वृक्षतोड केलेल्या वृक्षाची किंमत 31 हजार 4, 43 रुपये आहे. अवैध वृक्षतोड केलेल्या कंपनी विरुध्द वनविभागाने भारतीय वन अधिनियम 1927 चे अंतर्गत वन गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, सहा. वनसंरक्षक निकिता चौरे यांचे मार्गदर्शनाखाली चिचपल्लीच्या वनपरिक्षेत्राधिकारी प्रियंका वेलमे, मूलचे क्षेत्र सहायक एम. जे. मस्के, वनरक्षक सुभाष मरस्कोल्हे यांनी केली असुन जप्त माल मूल येथील बिट वनरक्षक यांच्या कार्यालयात जमा करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments