Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मुलचे कराटे प्रशिक्षक कपिल मसराम यांचा साऊथ सुपरस्टार डॉक्टर सुमन तलवार यांच्या हस्ते सत्कार हैद्राबाद येथे झाला सत्कार कार्यक्रम

मुलचे कराटे प्रशिक्षक कपिल मसराम यांचा साऊथ सुपरस्टार डॉक्टर सुमन तलवार यांच्या हस्ते सत्कार

हैद्राबाद येथे झाला सत्कार कार्यक्रम 

मूल प्रतिनिधी

नॅशनल शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया द्वारा आयोजित ७ वी आॅल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिप दिनांक ४ ते ५ जून ला हैदराबाद येथील कोटला विजय भास्कर रेड्डी इनडोर स्टेडियम येथे आयोजित करण्यात आले होते.

सदर स्पर्धेत भारतातील ७३० कराटे खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेला मुख्य अतिथी म्हणून साऊथ सिने स्टार डाॅ. सूमन तलवार हे उपस्थित असून त्यांचे हस्ते शाल व ट्राफी देऊन कराटे प्रशिक्षक कपिल मसराम यांचा कराटे या खेळाचा प्रसार व प्रचार चंद्रपूर जिल्हा व गडचिरोली जिल्हा या दोन जिल्ह्यातील खेळयापाड्यात २० वर्षापासून केल्याबद्दल तसेच अनेक राष्ट्रीय खेळाडू व कराटे प्रशिक्षक तयार केल्याबद्दल त्याच्या कार्याची दखल घेऊन सन्मान करण्यात आला.

Post a Comment

0 Comments