Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

ताडाळ्याच्या मुख्याध्यापकाचा मनमानी कारभार, बेजबाबदारपणे वागत असल्याची तक्रार

ताडाळ्याच्या मद्यपी मुख्याध्यापकाचा मनमानी कारभार, बेजबाबदारपणे वागत असल्याची तक्रार

मुल (प्रतिनिधी)

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथील प्रभारी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर खाडे शाळेमध्ये वेळेवर येत नाही, आले तर वर्गात शिकवत नाही. शाळेत शिकविणे सोडून मोबाईल पाहत बसतात. विद्यार्थ्यांसोबत उर्मटपणे वागतात. आणि विद्यार्थ्यांशी अश्लील शब्दात बोलतात.एवढेच नव्हे तर शाळेमध्ये आलेल्या साहित्याची व अन्नधान्याची शाळा व्यवस्थापन समितीला माहिती देत नाही. शाळेत दारू पिऊन येतात व बेजबाबदारपणे वागत असल्याची तक्रार ताडाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांनी मूल पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे.
मुख्याध्यापक खाडे हे शाळा व्यवस्थापन समितीची मासिक सभा वेळेवर लावत नाही. रेकॉर्ड बरोबर लिहून समितीसमोर दाखवीत नाही. चालू सत्रामध्ये शाळेची पूर्व तयारी करण्याकरिता मुख्याध्यापक यांना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य यांनी प्रत्यक्ष शाळेत भेटून आणि भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून सभा लावण्यास सांगितले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन सहभागी होण्यास टाळाटाळ करतात.मुख्याध्यापक खाडे यांचे शाळेकडे एकंदरीत दुर्लक्ष असून व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत असतात.
या सर्व बाबींची चौकशी करून मुख्याध्यापक खाडे यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी आणि त्यांचे ऐवजी दुसरे शिक्षक देण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे.
सदर निवेदन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद कोमलवार ,उपाध्यक्ष शिल्पा पिर्सिंगुलवार, सदस्य छाया जराते, नंदा याटेवार, प्रमोद बामणे, विनोद कागदेलवार, सुमित्रा बामणे, शरद बामणे, महेंद्र लोनबले, माधुरी वाडगुरे, प्रतिभा सोयाम, नितेश दहिवले आदींनी केली आहे.

Post a Comment

0 Comments