Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

आंदी घरकुलचे पैसे द्या, मंग मतदान मागाले या-रुखमाबाई शेंडे घरकुल लाभार्थी त्रस्त,लोकप्रतिनीधी सुस्त

आंदी घरकुलचे पैसे द्या, मंग मतदान मागाले या-रुखमाबाई शेंडे 

घरकुल लाभार्थी त्रस्त,लोकप्रतिनीधी सुस्त 

मूल (प्रतिनीधी)

सरकार मायबाप तुम्ही आम्हाले घरकुल देल्या.घरकुलचे पैसे आम्हाले मंजुर होऊन आलेले नाहीत.  दोन वर्षे झाले.दोन वर्षाकासुन अजुनही पैसे हातात आले नाहीत. पाऊस पाणी पडत आहे. आता कईवरी राहाचा. घर बांधाले लोकांकडुन कर्ज घेऊन,उसन्या मांगलो. ते लोकं आता पैसे मागाले घरी येत आहेत. आम्ही कसा कराचा अन् कसा राहाचा हेच समजत नाही. आम्ही पोट भराले जाऊ का? द्याहाले जाऊ. नगर परीषदेत जाऊन विचारला तर तुम्ही म्हनता की आठ दिवसाची मुजेत पंधरा दिवसाची मुजेत, तुमची मुजेत खतम होते, पण पैसे काही येत नाही. किती वेळा नगर परीषदेत जाहाचा. आता निवडणुक जवळ येत आहे. तुम्ही पायापोटी लागाल आणि म्हणाल का आता मतदान करा, आम्ही मतदान करणार नाही. अशी केविनवानी कहाणी मूलच्या इंदिरा नगर येथिल भांडे घासुन आपला उदर निर्वाह करणारी रुखमाबाई शेंडे मूल लाईव्ह जवळ व्यथा मांडली.

लिंक वर क्लिक करा आणि बघा व्हिडिओ


नगर परिषद मूल अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेसाठी केंद्र सरकारने एकही निधी आतापर्यंत दिला नाही. राज्य शासनाच्या निधीच्या भरोशावर घर बांधकामाला सुरवात केली.काम पूर्ण केलेल्या लाभार्थीना आतापर्यंत फक्त ८० हजार रुपये राज्य शासनाच्या हिस्याच्या निधीतून देण्यात आले आहे. अनेक लाभार्थीनी उसनवार रुपये मागुन घरासाठी खर्च केले आहे. बराच कालावधी लोटला असल्याने समोरील व्यक्ती उसनवारीचे व्याजासहित रक्कम मागत असल्याने अनेक लाभार्थीना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आज ना उद्या निधि येईल या आशेवर असलेल्या लाभार्थींच्या आशेवर पाणी फेरल्या जात आहे.चातका सारखी वाट बघणाऱ्या लाभार्थीना निराशा पदरी पडत असल्याने शासनाविषयी रोष व्यक्त केला आहे. 

बल्लारपूर विधानसभेचे आमदार सुधिर मुनगंटीवार यांना देखील अनेकदा निवेदन देण्यात येवुन केंद्राचा निधि मिळवून देण्याची मागणी केली माञ आश्वासनापलिकडे काहीच मिळाले नसल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. एकीकडे अर्धवट घर तर दुसरीकडे उसनवारीचे पैसे या विवंचनेत पंतप्रधान आवास योजनेचा लाभार्थि अडकला आहे. या बाबीकडे गंभीरतेने लद्वा देऊन समस्या सोडविने आवश्यक झाले आहे.


प्रतिक्रिया 
वसंता कवडू गुरनुले लाभार्थी मूल : पंतप्रधान आवस योजनेचा निधी लवकर मिळेल या आशेवर उसनवार करून घराचे बांधकाम करण्यात आले. माञ केंद्राचा व राज्याचा काही निधि न आल्याने पैसे अडून पडले आहेत. उसनवारी पैशावर व्याज देताना त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी शासनाने त्वरीत निधि देणे गरजेचे आहे.

सुजितजोगे शाखा अभियंता न प . मूल :- केंद्राचा व राज्य शासनाचा निधि मिळावा यासाठी संपुर्ण माहिती पाठविण्यात आली आहे. ही शासनाची बाब असल्याने निधि ऊपलब्ध झाल्याबरोबर त्वरीत लाभार्थीना देण्यात येईल.

Post a Comment

0 Comments