Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

आदर्श खेडा येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मायेची सावली उपक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रम

आदर्श खेडा येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मायेची सावली उपक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रम

मूल प्रतिनिधी

जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान संस्था व ग्रामपंचायत मारोडा यांच्या सहकार्याने मारोडा व आदर्श खेडा या गावांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मायेची सावली उपक्रम केंद्र सुरु आहेत.
या उपक्रम केंद्रात 60 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना एकत्र बसवुन प्रार्थना ,हलके व्यायाम ,योगा ,मनोरंजनात्मक खेळ,ध्यान साधना या सारखे उपक्रम घेऊन जेष्ठ नागरिकांच्या मनावरील ताणतणाव कमी व्हावे त्यांच्या शारिरिक आरोग्या सोबतच त्यांचे मानसिक आरोग्य जपता यावे यासाठी प्रयत्न केले जातात.
 या उपक्रम केंद्रामध्ये जेष्ठ नागरिक नियमित येऊन दिवसातले दोन-तीन तास विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतात .त्यापैकी शैला कुशवाह या महिला उपक्रम केंद्रामध्ये नियमित येतात परंतु त्यांना पायांचा त्रास असल्यामुळे त्यांना चालण्यात अडचण निर्माण होत असताना दिसून आली.  त्यांना त्यांच्या अडचणीत थोड्या प्रमाणात मदत करता यावी या उद्देशाने जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन आदर्श खेडा येथिल सरपंच मा. भिकारुजी शेंडे  साहेब  यांच्या हस्ते व्हील चेअर  देण्यात आली .या कार्यक्रमाला मायेची  सावली उपक्रम केंद्राचे स्वयंसेवक सोनी गबने ,  जनसेवा संस्थेच्या जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक डॉक्टर खुशबू चंदेल, प्रकल्पाचे सहायक व्यवस्थापक मा. प्रसाद वाघ सर,तालुका समन्वयक शुभांगी तरेवार व सुरज रापर्तीवार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments