Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

टेकाडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत काँग्रेस पार्टीचा विजय, काँग्रेसच्या अस्मिता मंगाम झाल्या विजयी

टेकाडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत काँग्रेस पार्टीचा विजय, काँग्रेसच्या अस्मिता मंगाम झाल्या विजयी 

मूल प्रतिनिधी
 

मूल तालुक्यातील टेकाडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत काँग्रेस पार्टीच्या अस्मिता आशिष मंगाम 42 मतांनी वंदना अनिल कुळमेथे यांचा पराभव केला. ही निवडणूक  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मध्यवर्ती सहकारी बँकेचे जिल्हा अध्यक्ष संतोषसिह रावत यांचे नेतृत्वात, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार,सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष संदीप कारमवार, बाजार समिती अध्यक्ष घनशाम येनूरकर यांचे मार्गदर्शनात लढविण्यात आली.

टेकाडी ग्रामपंचायत प्रभाग क्र.3 ची जागा रिक्त झाल्यामुळे सदर जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली. सदर प्रभागात काँग्रेस तर्फे अस्मिता आशिष मंगाम आणि वंदना अनिल कुळमेथे ह्या उमेदवार होत्या.

सदर निवडणुकीत एकूण 401 मतदान झाले. यामध्ये अस्मिता मंगाम यांना 219 मतदान तर वंदना कुळमेथे यांना 177 मतदान प्राप्त झाले. काँग्रेस पार्टीच्या अस्मिता मंगाम 42 मतांनी विजयी झाल्या.

या निवडणुकीत टेकाडी चे माजी सरपंच बापूजी कोटरंगे माजी सदस्य शरद सिडाम, ग्रामपंचायत सदस्य गणपत जराते,अंजना डोहणे, अरुणा कुमरे, सामाजिक कार्यकर्ते अनिल मोहुर्ले, साईनाथ पेंदोर, साजिद अली सय्यद, अंबादास मांदाडे, नीलकंठ कोटरंगे आदींनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments