Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, पडझरी येथील घटना

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, पडझरी येथील घटना

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यातील भादुर्णी गट ग्रामपंचायतीत पडझरी येथील परिसरात स्वतःच्या मालकीचे गुरे चरण्याकरिता गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज दुपारी 1 वाजताच्या दरम्यान घडली. प्रमोद झुंगाची मोहुर्ले वय 42 असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतकाचे नाव आहे.
घटनेची माहिती वनविभागाला दिली असून घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी पोहचले असून पंचनामा करीत आहे.

आज पडझरी जंगल परिसरात नेहमीप्रमाणे गुरे चरण्याकरिता गेला असता दबा धरून असलेल्या वाघाने त्या शेतकऱ्यावर हल्ला करुन ठार केले आहे. पडझरी हे गाव बाफरझोन क्षेत्रात येत असून या परिसरात वाघाचे हल्ले होत असतात. त्यामुळे वाघाचा बंदोबत करण्याची मागणी गावकरी करीत आहेत.

Post a Comment

0 Comments