Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

ओम कॅटर्स अॅंड सर्व्हीसवर कारवाई करण्यांची वनविभागाकडे स्वच्छता मित्राची माग

ओम कॅटर्स अॅंड सर्व्हीसवर कारवाई करण्यांची वनविभागाकडे स्वच्छता मित्राची मागणी


मूल प्रतिनिधी

 


मूल चंद्रपूर मार्गावरील, वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गावर ओम कॅटर्स अॅंड सर्व्हीसने त्यांचे सेवेनंतर, टाकावू अन्न पदार्थ व मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधीत असलेले डिस्पोजल प्लॉस्टिक टाकून वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात आणू पाहणार्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी स्वच्छता मित्रा गौरव शामकुळे यांनी वनविभागाकडे केली आहे.

ज्या मार्गावर हा विघातक कचरा टाकण्यात आला, तो मार्ग वाघ, हरीण, अस्वल यांचा भ्रमणमार्ग आहे. जंगलात प्लॉस्टिक प्रतिबंधक आहे.

असे असतांनाही, ओम कॅटर्स अॅंड सर्व्हीसेसनी जंगलात डिस्पोजल ग्लास, प्लेट, वाट्यासह खराब झालेले अन्न फेकून पर्यावरण कायद्याचा तसेच वन कायद्याचा भंग केला असून, यामुळे तलावाकडे पाणी पिण्यांसाठी जाणार्या वन्यप्राण्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाल्यांने संबधितांवर कारवाई करावी अशी मागणी स्वच्छता मित्रा गौरव शामकुळे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments