Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

राष्ट्रवादीच्या मूल महिला शराध्यक्षाचा विनयभंग, आरोपीना अटक व जामिन

राष्ट्रवादीच्या मूल शहर महिला अध्यक्षाचा विनयभंग, आरोपीना अटक व जामिन

मूल प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूल शहर महिला अध्यक्षा यांचे शेजारी राहणारे सत्यविजय वाळके त्यांची पत्नी आणि मुलगा आतिष सत्यविजय वाळके या तिघांनी मिळुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूल शहर महिला अध्यक्षा यांना अश्लील शब्दांत शिवीगाळ केली.  यांचे अंगावर धाऊन जाऊन विनयभंग केल्याची घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूल शहर महिला अध्यक्षा यांच्या बचावासाठी त्यांचा मुलगा आणि पती यांना आरोपींनी मारहाण केल्याची तक्रार मूल पोलीस ठाण्यात करण्यात आली.  तक्रारीवरून मूल पोलीसांनी आरोपीवर भादवी कलम 354,324,509,506,504 व 34 अन्वये वाळके कुटुंबीया विरूद्ध गुन्हा नोंद करून अटक केली. सदर घटना काल  6 तारखेच्या रात्रौ 10 वाजताचे दरम्यान घडली. तक्रारीतील आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. मूल न्यायालयाने तिघाही आरोपींना जामिन मंजूर केला.

Post a Comment

0 Comments