Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूलच्या ज्येष्ठ योग प्राशिक्षिका वंदना मुत्यलवार यांनी नागपुरात दिले योगाचे धडे

मूलच्या ज्येष्ठ योग प्राशिक्षिका वंदना मुत्यलवार यांनी नागपुरात दिले योगाचे धडे

मूल प्रतिनिधि

मूल शहरातील योग प्रशिक्षिका वंदना मुत्यलवार यांनी नागपूरच्या महिलांना योग प्रशिक्षन दिल्याने नागपूरच्या महिलांनी त्यांचे आभार मानले आहे.

वंदना मुत्यलवार हे मुल येथील पतंजली योग समितीच्या सदस्या असून ज्येष्ठ योग प्रशिक्षिका आहेत. त्या नागपूरातील पिंपळा येथे नातेवाईकाकडे घरगुती कार्यक्रमा करीता गेले असता त्यांचे दोन दिवस नागपुरात मुक्काम केला. ज्या ठिकाणी वंदना मुत्यलवार मुक्कामी होत्या त्या परिसरातील महिलांना माहिती झाल्याने तेथील महीलानी योगा शिकविण्याकरिता आग्रह केला, त्यावेळी जेष्ठ प्रशिक्षिका वंदना मुत्यलवार यांनी त्यांना योगा प्रशिक्षण दिले.
यावेळी अनुलोम-विलोम, कपाल भारती, सुष्म व्यायाम, सूर्यनमस्कार अशा विविध योगाचे धडे देऊन आरोग्याचा मूलमंत्र  मुलच्या ज्येष्ठ  योगा प्रशिक्षिका वंदना मुत्यलवार यांनी दिला.

Post a Comment

0 Comments