Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सुपुष्पमंगल संस्थेच्यावतीने माणूसकीची दोरी उपक्रम, गरजूंनी घेतला उपक्रमाचा लाभ

सुपुष्पमंगल संस्थेच्यावतीने माणूसकीची दोरी उपक्रम, गरजूंनी घेतला उपक्रमाचा लाभ

मूल प्रतिनिधी

मागील दोन वर्षांपासून सुपुष्पमंगल संस्थेच्या वतीने किरण नागापुरे यांनी माणुसकीची दोरी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. वापरण्यास योग्य असलेल्या पण वापरात नसलेल्या वस्तू, कपडे, बुक पेन, डायरी, स्कूल बॅग या वस्तू गरजू लोकांपर्यंत विनामूल्य पोहोचविण्याचे काम करीत आहेत.

सोमवारी चकघोसरी येथे माणुसकीची दोरी या उपक्रमाचे आयोजन करत गावातील चौकात एक दोरी बांधून त्यावर कपडे ठेवण्यात आले. गावातील गरजू लोक दोरीवर ठेवलेले कपडे विनामूल्य घेऊन गेले. ज्याच्याकडे वापरण्यास योग्य असलेल्या पण वापरात नसलेल्या वस्तू असतील, त्यांनी माणुसकीची दोरी या उपक्रमास कळवावे, असे आवाहन किरण नागापुरे व मंगल म्हाशाखेत्री यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments