Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल पंचायत समितीत पिण्याचे पाणी नाही, कर्मचाऱ्यांनी सरपंचांनाच दिला घरूनच पाणी आणण्याच्या अजब सल्ला

मूल पंचायत समितीत पिण्याचे पाणी नाही, कर्मचाऱ्यांनी सरपंचांनाच दिला घरूनच पाणी आणण्याच्या अजब सल्ला

मूल (प्रतिनिधी)
 
मूल पंचायत समितीची करोडो रुपये खर्चून भव्य इमारत बांधण्यात आले, मात्र या इमारतीत गैरसोयीच असून पिण्याचे पाणी सुद्धा पंचायत समिती मध्ये उपलब्ध नसल्याने, सामान्य नागरिकासह येथे येणाऱ्या लोकप्रतिनिधीनाही याचा फटका बसत आहे.  आज पंचायत समिती मध्ये सरपंच संघटनेची बैठक होती. या बैठकीत सरपंचांनी पंचायत समिती कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी मागितले असता कर्मचाऱ्यांनी मूल पंचायत समितीमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याचे सांगत तुम्हाला पाणी प्यायचे असल्यास घरूनच पाण्याची बॉटल आना असा अजब सल्ला दिला.
पंचायत समिती कर्मचार्‍याच्या भूमिकेमुळे सर्वजण अवाक् झाले करोडो रुपये खर्चून आणि कार्पोरेट कार्यालयाच्या धर्तीवर मूल पंचायत समितीचे देखण्या फर्निचर सह, भव्य दिव्य इमारत बांधण्यात आली मात्र या इमारतीमध्ये पिण्याच्या पाण्याची मूलभूत सुविधा होत नसल्याचे आता उघड झाले आहे.
सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा भेजगावचे सरपंच अखिल गांगरेड्डीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मूल पंचायत समितीमध्ये सरपंच संघटनेची बैठक बोलविण्यात आली. यात ही बाब उघड झाली.
सरपंच आणि पिण्याचे पाणी मागितले असता पंचायत समितीचे कर्मचारी यांनी पिण्याचे पाणी पंचायत समितीत नसल्याचे सांगितले. मूल पंचायत समिती मध्ये शेकडो ग्रामस्थ रोज येतात त्या कार्यालयात लोकप्रतिनिधींना पाणी नाही तर सामान्यांना पाणी कसे मिळेल अशी प्रतिक्रिया सरपंच संघटनेचे अध्यक्ष अखिल गांगरेड्डीवार यांनी मूल लाईव्ह शी बोलताना दिली.

Post a Comment

0 Comments