Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मॅजिक बस फाऊंडेशन तर्फे बोंडाळा बुज. गावात मॉडेल प्रदर्शनी, सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न

मॅजिक बस फाऊंडेशन तर्फे बोंडाळा बुज. गावात मॉडेल प्रदर्शनी, सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न

मूल (प्रतिनिधी)
 

मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका निरीक्षक कु.निकिता ठेंगणे यांच्या नेतृत्वात मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर व मुल येथील शाळा मधील  मूल  तालुक्यात  "SCALE" कार्यक्रमा अंतर्गत  विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी "खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास" हा उपक्रम मागील वर्षापासून अविरतपणे राबविला जात आहे. 
उपक्रमाचे विषेश म्हणजे हा उपक्रम शाळेत शिक्षकांच्या सहकार्यने राबविला जात आहे. 
विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य रुजविणे, माध्यमिक शिक्षण पूर्ण करणे व मुलींचे लग्नाचे वय वाढविणे अशा हेतूने मॅजिक बस संस्था चंद्रपूर जिल्ह्यात काम करीत आहे. 

मुल  येथे 29 जुन  2022 ला 'स्कूल चले हम'  या दिवसा निमित्ताने बोंडाळा बुज येथे  विद्यार्थ्याना मे महिन्यातील सत्रामध्ये दिलेल्या गृहपाठाची प्रदर्शनी ठेवण्यात आली. त्यात स्वागत गीत, शिक्षकांचे तसेच पालकांचे मॅजिक बस कार्याविषयी चे मनोगत  घेण्यात आले. तसेच ग्रामपंचायत बोंडाळा बुज च्या वतीने  मॅजिक बस च्या कार्याचा शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमात गावातील सरपंच मुरलीधरजी चुदरी, शाळा व्यवस्थापन समिती, जी.प.शिक्षक, विवेकानंद विद्यालय बेंबाळ शिक्षक तसेच शाळकरी मुल यांची उपस्थिती होती. मॉडेल  प्रदर्शनी मधे तिन नंबर काढून त्याना बक्षिश देऊन  गौरविण्यात आले तसेच सहभागी विद्यार्थ्यांना देखील बक्षीस देऊन गौरविण्यात आले.  या कार्यक्रमाचे  मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या  सामुदाय समन्वयक उपसरपंच प्रज्ञाताई बोरकुटे  तसेच शाळा सहाय्यक अधिकारी शुभांगी रामगोनवार यांनी  परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments