Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांना प्रदान करणार सुवर्णपदक, डॉ. रवींद्र होळी यांनी केला कुलगुरूकडे धनादेश सुपूर्द

आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांना प्रदान करणार सुवर्णपदक, डॉ. रवींद्र होळी यांनी केला कुलगुरूकडे धनादेश सुपूर्द

मूल प्रतिनिधी

आर्थिक अडचणीमुळे शिक्षण घेता न आलेल्या वडिलांच्या व आईच्या नावाने विज्ञान आणि मानवतावादी विषयातील पदवी पूर्व विद्यार्थ्यांसाठी सुवर्णपदक प्रदान करण्यासाठी मुलचे तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या कुलगुरूपुढे धनादेश सुपूर्द केलेला आहे.

शैक्षणिक सत्र 2021-22 पासून बीएससी विज्ञान विषयात अनुसूचित जमाती प्रवर्गातील गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थिनीला स्व. मंजुळाबाई साधुजी होळी यांच्या नावाने सुवर्णपदकासाठी 1 लाख 50 हजार रुपये तर स्व. साधुजी पाटील होळी यांच्या नावाने बीएससी विज्ञान आणि मानवतावादी विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना सुवर्णपदक देण्यासाठी एक लाख 50 हजार रुपयांचा धनादेश वित्त व लेखा अधिकारी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचे नावाने सुपूर्द केलेला आहे.

स्वर्गीय साधुजी पाटील होळी यांचे इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण झाले मात्र आर्थिक अडचणीमुळे पुढील शिक्षण त्यांना घेता आले नाही परंतु कुटुंबातील प्रत्येकांना त्यांनी उच्च शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. शिक्षणात हुशार असलेल्या समाजातील विद्यार्थ्यांवर आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात खंड पडू नये यासाठी सतत 2021 22 पासून स्व. साधूजी पाटील होळी आणि स्व. मंजुळाबाई साधूजी होळी यांचे नावाने सुवर्णपदक विद्यार्थ्यांना प्रदान करण्यासाठी तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी गडचिरोलीचे आमदार व काका यांच्या उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू बोकारे त्यांच्याकडे 3 लाखाचे धनादेश सुपूर्द केले.

Post a Comment

0 Comments