Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

अवैध रेती तस्करावर कारवाई, ट्रॅक्टर जप्त

अवैध रेती तस्करावर कारवाई, ट्रॅक्टर जप्त 

मूल प्रतिनिधी


मूल तालुक्यातील फिस्कुटी येथे अवैध रेती तस्करी करणाऱ्या एका ट्रॅक्टरला मूल प्रशासनाने पकडले असून मूल तहसील कार्यालयात ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहे.
ही ट्रॅक्टर शरद जेंगठे यांचे मालकीची असून त्यांचेवर कार्यवाही करण्यात आली आहे.

मूल तालुक्यात छुप्या मार्गाने अवैध रेती तस्करी सुरू असून या तस्करी ची माहिती मूलचे स्थानिक प्रशासनाला मिळतात. मूल चे तहसीलदार डॉ रवींद्र होळी यांचे मार्गदर्शनात तलाठी भाष्कर मेश्राम आणि तलाठी महेश पेंदोर यांनी विरई घाटाकडे पाहणी करिता जात असताना फिस्कुटी गावातील चौकात ही कार्यवाही करण्यात आली.

Post a Comment

0 Comments