Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे फिरोजभाई चा मृतदेह आढळला, परतवाघ म्हणून फिरोजची ओळख होती.

मूल येथे फिरोजभाई चा मृतदेह आढळला, परतवाघ म्हणून फिरोजची ओळख होती.

मूल प्रतिनिधी

मुल येथील बाबा गादीवाला यांच्याकडे काम करणारे आणि सिद्धी विनायक गणेश मंडळ येथे गणपती महोत्सवाला परतवाघ बनून मनोरंजन करणारा फिरोजभाई वय ४५ यांचा मृतदेह आज मूल येथे आढळून आल्याने खळबळ माजली आहे. फिरोजभाई हे इंदिरानगर वार्डात राहत होते. या वार्डाला लागूनच असलेले गोगीरवार,आंबकर यांचे खुल्या जागेवरील कंपाउंड जवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीवरून मूल पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन तपास सुरू केला, असता सदर मृतदेह फिरोज भाई यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
फिरोजभाई हे बाबा गादिवाला यांच्याकडे काम करत होते. सदर मृतकाचे शवाची परिस्थिती पाहता दोन-तीन दिवस पूर्वी फिरोजभाई चा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी पोलिस पंचनामा करीत आहे.

Post a Comment

0 Comments