Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

त्या डांबरच्या ब्रेकरची उंची कमी करा - प्रशांत समर्थ यांची मागणी

त्या डांबरच्या ब्रेकरची उंची कमी करा - प्रशांत समर्थ यांची मागणी

मूल प्रतिनिधी

मूल शहरातील चंद्रपूर रोडवर असलेल्या सावरकर यांचे घरासमोर बांधकाम विभागाने डांबराचे अति उंच ब्रेकर बनविल्यामुळे जड वाहने ब्रेकर वर बंद पडून अपघात वाढत आहे. त्यामुळे त्या डांबराच्या ब्रेकरची उची कमी करण्यात यावी, अशी मागणी मूल नगर पालिकेचे माजी नगरसेवक प्रशांत समर्थ यांनी बांधकाम विभागाकडे केली आहे.

ब्रेकर उंच असल्यामुळे अनेक मोठी जड वाहने  ब्रेकर वर येऊन बंद पडत असतात. या डांबर ब्रेकर वरून चालनाऱ्या जड वाहनाचे शॉकअप पट्टे तुटत आहेत. आता पर्यंत 9 ते 10 जड वाहणाचे शॉकअप पट्टे तुटल्यामुळे भर रस्त्यावरच ट्रक उभे करुन ठेवावे लागत आहे. शॉक अप पट्टे तुटत असल्याने जड वाहन धारकांना आर्थिक भुर्दंड आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

चंद्रपूर मार्ग हा रहदारीचा आणि राज्य मार्ग असल्याने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. भर रस्त्यावरच जड वाहने उभे ठेवल्याने छोटे मोठे अपघात येथे होत आहेत. भविष्यात मोठा अपघात टाळण्यासाठी अति उंच तयार करण्यात आलेले डांबराचे ब्रेकर ची उंची कमी करण्याची मागणी प्रशांत समर्थ यांनी केली आहे.

प्रतिक्रिया
प्रशांत समर्थ
माजी नगर सेवक, नगर परिषद, मूल

चंद्रपूर रोड वर  सावरकर यांचे घरासमोर डांबरचे ब्रेकर होते ते ब्रेकर फुटले असल्याने काही दिवसाआधी त्याचे काम करण्यात आले मात्र ब्रेकर बनविताना नियोजनपूर्वक न बनविता ब्रेकर अतिउंच बनविण्यात आले.त्यामुळे जड वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून अपघात वाढले आहेत.

Post a Comment

0 Comments