Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

ग्रामपंचायतिचे थकबाकी असलेले रक्कम त्वरित जमा करा - 49 ग्रामपंचायतीने महावितरन विभागाला दिले नोटीस

ग्रामपंचायतिचे थकबाकी असलेले रक्कम त्वरित जमा करा - 49 ग्रामपंचायतीने महावितरन विभागाला दिले नोटीस 

मूल (प्रतिनिधी)

पथदिव्याच्या वीजबिलाची रक्कम थकविल्यांच्या कारणावरून, महावितरणनने ग्राम पंचायतीचे वीज कनेक्शन कपात केले यामुळे गांव अंधारात गेले. महावितरणचे थकीत वीजबिल शासनाने भरावे अशी मागणी होत असतांनाच, मूल तालुक्यातील 49 ग्राम पंचायतीने आपल्या ग्राम पंचायतीत ठराव पारित करून, गावातील वीज पोल, डिपी, तारेचे गोळा, हाय टेंशन, पोल, तार व गोळा यापासून, महावितरण कंपनी करोडो रूपये नफा कमवीत आहे.  मात्र महावितरण ग्राम पंचायतीला कोणताही कर देत नसल्यांचे ग्राम पंचायतीचे नुकसान होत असल्यांचे सांगत, हा कर ग्राम पंचायतीत तातडीने भरावा अशी नोटिसच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मूलचे उपअभियंता यांना सरपंचानी दिली आहे.

मूल तालुक्यातील 49 ग्राम पंचायतीने नोटिस बजावली आहे.  भेजगाव ग्राम पंचायतीचे सरपंच, अखिल गांगरेड्डीवार यांनी सन 2004—2005 ते सन 2021—2022 पर्यंतची 1,10,41,092/— थकीत कर तत्काळ ग्राम पंचायत कार्यालयात भरणा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

अशीच करोडो रूपये थकीत कराची मागणी इतरही ग्राम पंचायतीने केली असून, ग्राम पंचायतीची अब्जावधीची थकबाकी महावितरणकडे यानिमीत्ताने निघणार आहे.
महावितरणने आपल्या थकीत बिलापोटी ग्राम पंचायतीची वीज कनेक्शन कापले, याबाबत राज्य स्तरावर चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभुमीवर ग्राम पंचायतीने महावितरणच्या विरोधात 'नहले पे दहला' लगावल्यांने, महावितरण आता कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments