Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

"इन्स्पिरेशन कप" या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कराटे अँड फिटनेस क्लब मूल ची मोहर

"इन्स्पिरेशन कप" या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कराटे अँड फिटनेस क्लब मूल ची मोहर

मूल प्रतिनिधी

नागपूर येथे दिनांक 28 आणि 29 मे रोजी "इन्स्पिरेशन कप" - द्वितीय राज्यस्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा पार पडली ज्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांचा सहभाग होता. या स्पधेत कराटे अँड फिटनेस क्लब मूल च्या 9 खेळाडूंनी सहभाग घेत दमदार कामगिरी केली ज्यात श्रीजा सहारे एक सुवर्ण आणि एक रजत पदक,श्रीनिधी येनुगवार सुवर्ण पदक, विधी कोटकोंडावार सुवर्ण पदक, दिव्या नरड एक सुवर्ण आणि एक रजत पदक, धरती भोयर ने दोन रजत पदक, स्वरा वाकडे हिने एक रजत आणि एक कांस्य पदक, नैतिक ढोबे ने कांस्य पदक, साक्षी गुरनुले रजत पदक मिळवत एकूण चार सुवर्ण, सहा रजत आणि दोन कांस्य पदक क्लब च्या नावाने जमा केली. स्पर्धेचा विशेष आकर्षण असलेल्या "चॅम्पियन ऑफ चॅम्पियन (मुली)" या प्रकारात क्लब च्या दिव्या नरड हिने प्रथम क्रमांक तर विधी कोटकोंडावार हिने द्वितीय क्रमांकाची भव्य ट्रॉफी आपल्या नावी केली. या प्रकारात दिव्या आणि विधी ची खेळी प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरली. वरील सर्व खेळाडूंच्या पालकवर्गामध्ये आनंदाचा वातावरण असून सर्वत्र खेळाडूंचे कौतुक होत आहे. खेळाडूंना कराटे अँड फिटनेस क्लब मूल चे संचालक-प्रशिक्षक इम्रान खान व निलेश गेडाम यांचे मार्गदर्शन आणि सेन्सेई विनय बोढे सर यांचे आशीर्वाद लाभले आहे.

Post a Comment

0 Comments