Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

विविध कार्यकारी सहकारी संस्थेतर्फे पाणपोई, अध्यक्ष संदीप कारमवार यांच्या हस्ते उदघाटन

विविध कार्यकारी सहकारी संस्थेतर्फे पाणपोई, अध्यक्ष संदीप  कारमवार यांच्या हस्ते उदघाटन

मूल प्रतिनिधी


विविध कार्यकारी सहकारी संस्थेतर्फे कार्यालयाच्या परिसरात पाणपोई सुरु करण्यात आली. या पाणपोई चे उदघाटन विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष संदीप कारमवार यांनी केले.

विशेष म्हणजे संस्थेच्या कार्यालयाला लागून सरकारी धान्य दुकान आहे. यात रोज शेकडो नागरिक धान्य घ्यायला येत असतात. कार्ड धारक नागरिकांना धान्य घेत पर्यंत काही काळ थांबून राहावे लागते. धान्य दुकानात येणारे नागरिक हें गोर गरीब कुटुंबातील असल्याने तहान लागल्यास पाणी घेऊन पिऊ शकत नाही. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकावे लागू नये, अश्या परिस्थितीत त्यांना पिण्यायोग्य शुद्ध व थंड पाण्याची सोय व्हावी, या सामाजिक हेतूने विविध कार्यकारी सहकारी संस्थेतर्फे पाणपोई लावून धान्य दुकानात येणाऱ्या नागरिकांची तहान भागवली आहे.


पाणपोईच्या उदघाटन प्रसंगी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद बोरुले, संचालक विवेक मुत्यलवार, भोजराज गोवर्धन,रवि कामडी,संजय बदेलवार सचिव आदी उपस्थित होते. पाणपोई लावून थंड पाण्याची सोय करुन दिल्याने नागरिकांनीही विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे आभार मानले आहे.

Post a Comment

0 Comments