Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथील कापड दुकान आणि कास्मेटिक दुकान जळून खाक, लाखोचे नुकसान

मूल येथील कापड दुकान आणि कास्मेटिक दुकान जळून खाक, लाखोचे नुकसान 

मूल प्रतिनिधी

मूल शहरातील सोमनाथ रोडवरील विश्वजीत उडान यांचे मालकीचे लक्ष्मी ब्युटी कलेक्शन आणि मयूर शेख यांच्या मालकीचे विलेन विला या कापड दुकानाला अचानक आग लागल्याने संपूर्ण दोन्ही दुकान जळून खाक झाले आहे.ही घटना रात्रौ 1 वाजताचे दरम्यान घडली.

आग लागल्याची माहिती होताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. यात मोठी आग लागली असल्याने मूल, चंद्रपुर, सावली आणि पोंभुर्णा येथून  अग्निशमन दलाची गाडी वेळेवर आल्याने आग विझविण्यात यश आले. मात्र तो पर्यंत मयूर शेख यांचे कापड दुकान आणि विश्वजीत उडान यांचे कास्मेटिक दुकानातील सामान संपूर्ण जळून खाक झाले होते. यात उडान यांचे कास्मेटिक दुकानाचे 15 लाखाचे आणि शेख यांचे कापड दुकानाचे लाखोचे मोठे नुकसान झाले आहे.

दोन्ही दुकानात आताच नविन माल भरले असल्याने मोठे नुकसान झाले असून दोन्ही युवकांची मोठी हानी झाल्याचे बोलल्या जात आहे.

आग नियंत्रणात आणण्याकरिता मूल पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीशसिह राजपूत त्यांचे सहकारी नगर परिषदेचे अभय चेपूरवार सहकारी आदी कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments