Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

बस अंगावरून गेल्याने मेक्यानिकलचा दुदैवी मृत्यू, मूल बस्थानकावरील घटना

बस अंगावरून गेल्याने मेक्यानिकलचा दुदैवी मृत्यू, मूल बस्थानकावरील घटना

मूल प्रतिनिधी

नादुरुस्त बस दुरुस्ती करताना चंदपूर डेपोतील बस यांत्रिकाच्या अंगावर बस गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन चंद्रपूर नेत असतानाच वाटेत त्याचा मृत्यु झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. राजु दांडेकर वय 45 वर्षे रा. चंद्रपूर असे मृत्त पावलेल्या यांत्रिकीचे नांव आहे.

मूल येथील बस स्थानकावर एम एच 14 एच डी 8243 क्रमांकाची बस नादुरुस्त होती, बस दुरुस्ती करण्यासाठी चंद्रपूर डेपोतील बस यांत्रिकी राजु दांडेकर हा मूल येथे येवून बस दुरुस्ती करण्यासाठी बसच्या समोर होता, दरम्यान उंच भागावर असलेली बस अचानक समोर असलेले यांत्रिकी राजु दांडेकर यांच्या अंगावर आल्याने तो गंभीर जखमी झाला, त्याला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूर रेफर करण्यात आले, मात्र चंद्रपूरला नेत असतानाच वाटेतच त्यांची प्राणज्योत मावळली.

Post a Comment

0 Comments