Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

वन्यप्राण्यांचे हल्ले टाळण्यासाठी उपाययोजना करावी, प्रकाश पाटील मारकवार यांची महसूल मंत्र्याकडे मागणी

वन्यप्राण्यांचे हल्ले टाळण्यासाठी उपाययोजना करावी, प्रकाश पाटील मारकवार यांची महसूल मंत्र्याकडे मागणी 

मूल प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये अनेकांचा जीव जात आहे. अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिलेल्या निवेदनातून केली. तसेच याबाबत मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करावी, अशी विनंतीही केली आहे.

चंद्रपूर जिल्हा वनाच्छादित आहे. परंतु, मागील काही वर्षात घनदाट जंगले नष्ट होऊन विरळ होत चालले आहे. उन्हाळ्यामुळे पाणवठे आटल्याने पाण्याच्या शोधात प्राणी स्थलांतर करीत आहेत, अशा कारणामुळे हल्ल्याचे प्रमाण वाढत आहे. यावर उपाययोजना म्हणून जंगलात जलसाठे तयार करणे, खाद्य असलेल्या वन्यजीव प्रजाती वाढविण्यास प्रयत्न करणे, विरळ होत चाललेल्या जंगलांना

फॉरेस्ट कॉरिडॉरच्या मार्फत जोडून वन्य प्राण्यांकरिता स्थलांतर जंगलमार्गे सुकर करावे, पर्यावरण तज्ज्ञांद्वारे सखोल अभ्यास करून भौगोलिक माहिती प्रणालीच्या माध्यमातून प्रत्येक गावातील नागरिकांना धोक्याचे संकेत देता येतील, अशी यंत्रणा तयार करावी, इंधनाकरिता सरपण आणण्याची परवानगी ठरावीक वेळेत विशिष्ट भागात देण्यात यावी, अशा वेळेस वन अधिकाऱ्यांची सूक्ष्म देखरेख व सुरक्षाबळ सोई प्रदान करण्यात याव्या, अशा आशयाचे निवेदन पाटील यांनी महसूल मंत्र्याकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments