Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

दोनशे वर्षांपूर्वी बनविलेल्या "उखळाचा" आजही होतो वापर, चार पिढीपासून उपयोगात आहे दगडाचा "उखळ"

 

मूल (अमित राऊत)

मूल शहरातील वॉर्ड नं.1 येथे वास्तव्यात असलेल्या देवाजी राघमवार यांच्या घरी तीन ते चार पिढीपासून म्हणजेच दोनशे अडीशे वर्ष्यापूर्वी पासून दगडापासून बनविलेले भल्ले मोठे "उखळ" आजही वापरात आहे.


या उखळाचा वापर सणासुदीला आणि दैनंदिन जीवनात तांदूळ, डाळ, मसाला कांढण्यासाठी तर तिकट, चिंच असे विविध पदार्थ वाटण्यासाठी उपयोगात आणल्या जात आहे.

जुन्या काळात दगडाच्या उखळाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केल्या जात होता. त्यावेळेस मिक्सर नसल्याने सनावाराला पदार्थ बनविण्याकरिता दगडाचा उखळ वापरत असे. आजही अनेकांची परिस्थिती गरीब असल्याने किंवा अनेकांच्या घरी मिक्सर सारख्या वस्तू नसल्याने या दगडाच्या उखळाचाच वापर केल्या जात असल्याचे दिसून येत आहे.

या दगडाच्या उखाळाचा वापर करायला त्रास होत असला तरी आधीच्या महिलांना दगडाच्या उखळातच वाटणे, काढण्याची सवय झाल्याने त्यांना ते सोपे वाटते.

आधीच्या काळातील अनेक परंपरा, वस्तूंच्या आठवणी अश्याच कायम ठेवण्याचा प्रयत्न जुन्या काळातीलच लोक ठेवत असल्याचे यातून दिसते.

Post a Comment

0 Comments