Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे आंबीलपोई, रमेश तांगडे यांचा स्तुत्य उपक्रम

मूल शहरात उन्हाळ्याच्या दिवसात दरवर्षी रमेश तांगडे हें आंबीलपोई लावून  ये जा करणाऱ्या वाटसरुंची भूक भगवीण्याचा काम करीत आहे. या आंबिलपोचे उदघाटन रमेश तांगडे यांनी केली आहे. उदघाटनावेळी मूल येथील योगा शिक्षक अनिल गांगरेड्डीवार, श्री साई मित्र परिवार संस्थेचे विवेक मुत्यलवार, गणेश मांडवकर आदींची उपस्थिती होती.

मूल शहरात गेल्या सात वर्षांपासून तांगडे हे चंद्रपूर रोड वर असलेल्या घरासमोर  दरवर्शी आंबीलपोई आणि पाणपोई ची सोय करतात. गरीबाची लस्सी म्हणूनही आंबिल पीत असतात. ग्रामीण भागात अंबिलीला जास्त मागणी असते. 

आंबीलपोई ची सोय केल्यामुळे शहरात विविध कामासाठी आलेल्या नागरिकांना तहान आणि भुक लागली असल्यास आंबिल पिल्याने भूक भागत असते. आंबील सोबतच लोणचाची सोय सुद्धा या ठिकाणी ठेऊन असते.

भूक आणि तहान भागवीणारी आंबिलपोई ची सोय रमेश तांगडे यांनी स्वतः स्वखर्चातून सुरु केल्याने नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे.

Post a Comment

0 Comments