Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सोमनाथ श्रमसंस्कार शिबिरार्थ्यांचे केले स्वागत

सोमनाथ श्रमसंस्कार शिबिरार्थ्यांचे केले स्वागत

मूल प्रतिनिधी

मुल तालुक्यातील सोमनाथ येथे मागील पन्नास वर्षांपासून दरवर्षी आंतर भारती - भारत जोडो या अभियानाअंतर्गत श्रमसंस्कार छावणी शिबीर आयोजित केल्या जाते, दिवंगत बाबा आमटे यांनी हे शिबीर सुरू केले होते, 15 मे ते 22 मे ही कालावधी दरवर्षी शिबिरासाठी ठरली असून संपूर्ण भारातातील सर्व प्रांतातून या शिबिरात शिबिरार्थी हजेरी लावतात, कोरोना मुळे दोन वर्षांपासून हे शिबीर बंद होते. या वर्षी हे शिबीर होत असून आज सकाळपासून सदर शिबिरात हजेरी लावण्यासाठी वेगवेगळ्या राज्यातील महिला व पुरुष शिबिरार्थी पोहचत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या कडक उष्णता असून भीषण गर्मीत शिबिरार्थी मुल बस स्टॉप ला पोचत आहेत. या शिबिरार्थयाना दिलासा देण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर गोगुलवार यांनी बस स्टॉप समोरील स्वताच्या कॉम्प्लेक्स मध्ये थंड कूलर मध्ये बसण्याची व्यवस्था करत थंडी पाणी, शरबत, बिस्कीट, चहा ची व्यवस्था केली आहे, या ठिकाणाचे व्हाट्सएप लोकेशन पहिलेच नोंदनी केलेल्या सर्व शिबिरार्थयाना पाठविण्यात आले होते त्यामुळे ते सहजतेने या ठिकाणी पोहचत आहेत, या ठिकाणावरून सोमनाथ प्रकल्पाच्या बस ने शिबिर ठिकाणी पोहचवल्या जात आहे, शिबिरार्थयांचे स्वागत करण्यासाठी मूल नप चे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, सामाजिक कार्यकर्ते किशोर कापगते, दिनेश हेडाऊ, किशोर गोगुलवार हे हजर असून त्यांना शिबिरासाठी शुभेच्छा देत आहेत, काही वर्षाच्या कालावधी नंतर शिबिराला येणारयांनी मुल शहराचा कायापालट होत स्मार्ट सिटी झाल्याचे वासत्व बोलून दाखवले.

Post a Comment

0 Comments