Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

नांदगाव सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत कांग्रेस पॅनलचा दणदणीत विजय

नांदगाव सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत कांग्रेस पॅनलचा दणदणीत विजय

मुल प्रतिनिधी

नांदगाव सेवा सहकारी संस्थेच्या आज झालेल्या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा चंद्रपुर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष कांग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात व पंचायत समितीचे माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, आणि माजी जि. प.सदस्य प्रशांत बांबोले यांच्या सहकार्याने सेवा सहकारी संस्था नांदगांवचे सर्वच्या सर्व १३ पैकी १३ जागा जिंकत दणदणीत विजय मिळविला.


कांग्रेसच्या विजयी उमेदवारामध्ये सुनंदा सुनील काळे, सखुबाई गुडडी गम्पलवार, गंगाधर कवडू शिंदे, प्रकाश आंबटकर, प्रभाकर अमलवार, सदाशिव मशाखेत्री, वसंत मोहूर्ले, नीलकंठ नरसपुरे, संदीप रायपल्ले, अशोक उमक, मंदाबाई लाकडे, त्रिमूर्ती नाहगमकर हे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले. सर्व विजयी उमेदवारांचे मुल तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने हार्दिक अभिनंदन केले असून कांग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या कांग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोशसिंह रावत, पं स.माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, माजी जि. प.सदस्य प्रशांत बांबोले सहकार्य करणारे सर्व कांग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे तालुका कांग्रेसच्या वतीने जाहीर आभारही मानले आहे.

Post a Comment

0 Comments