Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

वाघाच्या हल्ल्यात शेतमजूराचा मृत्यू, करवण येथील घटना

वाघाच्या हल्ल्यात शेतमजूराचा मृत्यू, करवण येथील घटना 

मूल प्रतिनिधी



मूल तालुक्यातील करवण येथील शेतात काम करण्याकरिता गेलेल्या शेत मजुरावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज सकाळी आठ वाजताच्या दरम्यान घडली. शेतमजुराचा जागीच मृत्यू झाला. रामभाऊ कारु मरापे वय 42 असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतकाचे नाव आहे.
घटनेची माहिती वनविभागाला दिली असून घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी पोहचले असून पंचनामा करीत आहे.

मुल येथील सुरेश हरडे यांच्या मालकीच्या शेतात रामभाऊ हा शेतमजूर म्हणून काम करीत होता. आज मंगळवार ला सकाळी 8 वाजता शेतात काम करण्याकरिता गेला असता शेतातच दबा धरून असलेल्या वाघाने शेतमजूरावर हल्ला करुन ठार केले आहे. करवण गाव हा जंगल परिसरात असल्याने येथे वारंवार वाघाचे हल्ले होत असतात. त्यामुळे वाघाचा बंदोबत करण्याची मागणी गावकरी करीत आहेत.

Post a Comment

0 Comments