Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

भादुर्णी येथे निघाली कृषी जनजागृती गावफेरी, खरीप हंगाम पूर्व प्रचार-प्रसार मोहीम

भादुर्णी येथे निघाली कृषी जनजागृती गावफेरी, कृषी विभागातर्फे खरीप हंगाम पूर्व प्रचार-प्रसार मोहीम

मूल (अमित राऊत)

सर्वत्र कृषी विभागामार्फत खरीप हंगाम प्रचार प्रसार पंधरवडा मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून खरीप हंगाम पूर्व प्रचार प्रसार मोहीम कृषी जनजागृती गाव फेरी भादुर्णी येथे महिला बचत गट व ग्राम कृषी समिती यांच्या सहकार्याने काढण्यात आली. यावेळी गावातील मुख्य चौकात मुख्य चौकात गावकर्यांना आणि शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया करून दाखविण्यात आले, खरीप लागवड ते काढणी, निंबोळी उर्क तयार करणे, धान बीजप्रकिया करणे, नवीन जाती धान, गांडूळ खत वापर, माती परीक्षण, खते, औषधी वापरी,10 टक्के रासायनिक खतांचा वापर कमी करणे ,विकेल ते पिकेल, मल्चिंग पेपर वरती भाजीपाला वापर ,धान पेरणी पद्धती, फळबाग लागवड,नाडेप ,भाजीपाला रोपवाटिका, असे अनेक विषयांचे फलक तयार करून गावातील शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.या कार्यक्रमाचे नियोजन कृषिसहायक शिल्पा मंत्रीवार यांनी केले. तर कृषी पर्यवेक्षक रवि उईके, मंडळ कृषी अधिकारी श्री तिजारे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शन केले. 

Post a Comment

0 Comments