Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकामात भ्रष्टाचार, उलगुलान संघटनेची चौकशीची मागणी

प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकामात भ्रष्टाचार, उलगुलान संघटनेची चौकशीची मागणी

मुल प्रतिनिधी

मूल तालुक्यातील मौजा बेंबाळ येथे मागील दोन वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम सुरू आहे. सदर बांधकाम हे अत्यंत धीम्या गतीने सुरू असून यामध्ये लाखो रूपयाचा भ्रष्टाचार होत असताना आढळून आलेला आहे.
        उलगुलान संघटनेचे जिल्हा संयोजक प्रशांत उराडे, बेंबाळचे सरपंच कु. करुणा उराडे, युवक तालुका काँग्रेस अध्यक्ष पवन निलमवार, तसेच सामाजिक कार्यकर्ते उमाकांत मडावी, राहुल डंकरवार यांनी गावकऱ्यांच्या तक्रारीवरून प्रत्यक्ष दवाखाना बांधकामाची पाहणी केली. दवाखान्याच्या बांधकामाची पाहणी केली असताना कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आढळून आले. सदर कामांमध्ये सिमेंटचा वापर अत्यंत कमी करून प्लास्टर करण्यात आले तसेच प्लास्टरला हात लावले असता एकदम कच्चे प्लास्टर आढळून आले. पेव्हर ब्लॉकचे काम थातूरमातूर होत असून नवीन वॉल कंपाऊंडला जुन्याच वॉल कंपाउंडचे जीर्ण झालेले ग्रिल लावण्यात येत आहे. संपूर्ण इमारतीला पाण्याचा मारा व सिमेंटचा कमी वापर केल्यामुळे इमारतींना आतापासून भेगा पडत आहेत. छताची चौकशी केली असता छताला बारीक-बारीक छीद्र पडत असून संपूर्ण इमारतीचे करोडो रुपयाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधलेले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून याची तात्काळ प्रशासकीय स्तरावरून चौकशी करावी व ठेकेदार व कंत्राटदार जर दोषी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे जिल्हा संयोजक प्रशांत उराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना केली.
   वरील बांधकामाची तात्काळ चौकशी करण्यात आली नाही, बांधकाम सुरळीत करण्यात आले नाही.तसेच भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली नाही तर या विरोधात संपूर्ण गावकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशांत उराडे, पवन निलमवार, उमाकांत मडावी, राहुल डंकरवार तसेच इतर कार्यकर्त्यांनी दिला.

Post a Comment

0 Comments