Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

राज्यमंत्री तनपुरे यांच्या उपस्थितीत बंडू साखलवार यांनी बांधली घड्याळ, मूलच्या शेकडो युवकांसह राष्ट्रवादीत घेतला प्रवेश

राज्यमंत्री तनपुरे यांच्या उपस्थितीत बंडू साखलवार यांनी बांधली घड्याळ, मूलच्या शेकडो युवकांसह राष्ट्रवादीत घेतला प्रवेश

मूल प्रतिनिधी

मूल येथील सामाजिक कार्यकर्ते श्री साई बोरवेल चे मालक बंडू साखलवार यांनी राज्याचे राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत मूल च्या युवकांना घेऊन राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांचे उपस्थितीत घेण्यात आला. आढावा बैठकित शेकडो युवकांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष सुमीत समर्थ ह्याच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश करण्यात आला.

प्रमुख प्रवेशामध्ये सामाजिक कार्यकर्ते, श्री साई बोरवेल्सचे मालक बंडू साखलवार, युवा कार्यकर्ते रितिक पोगूलवार ,रुपेश एडनूतलवार , चेतन लाकडे , देवानंद गुरनूले , दीपक गुरनूले, दीपक घोंगडे, पवन कारेंगवार, आखीप पठाण, नीरज तुपकर , विक्रांत नाकतोडे, आदींनी प्रमुख कार्यकर्त्यांनी सुमित समर्थ ह्यांचे नेतृत्व स्वीकारून युवा बांधवांनी पक्ष प्रवेश केला. पक्षप्रवेश करणाऱ्या युवकांना पक्षात नेहमी सन्मानाची वागणूक मिळेल, असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेस च्या उपस्थित नेत्यांनी दिला.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अहोरात्र झटून पक्ष घरा- घरात पोहचवू असे प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी चंग बांधला. राष्ट्रवादी पक्षात पप्रवेश करणाऱ्या सर्व युवकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष किसनराव वासाडे, शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे ,महिला शहर अध्यक्षा अर्चना चावरे, महिला तालुका अध्यक्षा नीता गेडाम, युवक तालुका अध्यक्ष समीर अल्लूरवार, तालुका सचिव ज्ञानेश्वर वाघमारे, तालुका उपाध्यक्ष दुशांत महाडोळे, शहर महासचिव प्रदीप देशमुख,  आदिनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments