Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

निवडणुकीत ओबीसी समाजातल्या सर्व जातींना संख्येच्या प्रमाणात जागा उपलब्ध करुन द्या - माळी समाजाच्या सभेत केली मागणी

निवडणुकीत ओबीसी समाजातल्या सर्व जातींना संख्येच्या प्रमाणात जागा उपलब्ध करुन द्या - माळी समाजाच्या सभेत केली मागणी

मूल प्रतिनिधी

मुल येथील रामलीला भवनात चंद्रपूर जिल्हास्तरीय सर्व शाखीय, सर्वपक्षीय माळी समाज बैठकीचे आयोजन करण्यात आले . सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या संदर्भात रद्द झालेले ओबीसी आरक्षण आणि ओबीसींची जातिनिहाय जनगणना यावर गंभीर चिंतन करण्यात आले. ओबीसी आरक्षणाला कोणतेही सरकारचा आणि कोणत्याही पक्षाचा विरोध नसताना ओबीसी आरक्षण आणि ओबीसी जाती न्याय देणार का? असा सवाल बांधवांतर्फे करण्यात आला. ओबीसीचे छुपे शत्रू कोण? असा सवाल  या बैठकीत करण्यात आला. समर्पित आयोगाला त्याबाबत निवेदन देण्याचा ठराव पारित करण्यात आला. सोबतच जर संवैधाणीक आरक्षण ओबीसींना मिळत नसेल तर राजकीय पक्षांनी सत्ताधारी असो की विरोधक यांनी  माळी समाजालाच नव्हे तर सर्व ओबीसी समाजातील सर्व जातींना  त्यांच्या संख्येच्या प्रमाणात राज्यामध्ये  होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जागा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली.
तसेच या मागणीला उचलून धरण्यासाठी समाजाचे एक प्रतिनिधी मंडळ नेमण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीला ज्येष्ठ ओबीसी नेते प्राध्यापक नामदेवराव जेंगठे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ महाडोळे ,डॉक्टर राकेश गावतुरे ,प्राध्यापक माधव गुरनुले,प्रशांत सोनुले, समता परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक विजय लोनबले, सावली चे जेष्ठ कार्यकर्ते प्रल्हादजी कावळे ,समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते बंडूभाऊ गुरनुले ,डॉक्टर पद्माकर लेनगुरे, ज्ञानज्योती फाउंडेशन सावलीचे दिनकरराव मोहूर्ले यांच्यासह सर्व तालुक्यातून आलेले असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments