Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

तेंदूपत्ता मजुरावर वाघाचा हल्ला, मजूर जागीच ठार

तेंदूपत्ता मजुरावर वाघाचा हल्ला, मजूर जागीच ठार

मूल प्रतिनिधी

सध्या तेंडुपत्ता तोडण्याची सिजन चालू असल्याने तेंडुपता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या इसमावर दबा धरून बसलेल्या वाघाने जागीच ठार केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. खुशाल गोविंदा सोनुले वय वर्षे 56 रा. भादुर्णी तालुका मूल असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या ईसमाचे नाव आहे.
खुशाल गोविंदा सोनुले हें भादुर्णी मारोडा येथील जंगलात तेंडुपत्ता तोडण्याकरिता काल गेला होता. सायंकाळ झाली तरी तो परत आला नाही. याची माहिती होताच सर्वत्र शोधाशोध करणे सुरु झाले.

वनविभागाने शोध घेतले असता आज सकाळी मारोडा बिट 2 या जंगल परिसरात कुशाल सोनुले याचा प्रेत आढळून आला. घटनेचा पंचनामा वनविभागाने केला. घटस्थळी 
मूलचे वनपरीक्षेत्र अधिकारी नायगमकर, क्षेत्र सहाय्यक पाकेवार, वनसरक्षक वट्टे, कर्मचारी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments