Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

दुर्मिळ कचरकांदे मूल बसस्थानकावर विक्रीला

दुर्मिळ कचरकांदे मूल बसस्थानकावर विक्रीला

प्रतिनिधी (प्रशांत गणवीर )

दरवर्षी उन्हाळ्यात दुर्लक्षित व तेवढाच दुर्मिळ असलेला कचराकांदा मुल बस स्थानक परिसरात हमखास विक्रीसाठी उपलब्ध असतो. हा कचरकांदा उन्हाळ्याच्या दिवसात आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे बोलले जाते.
    नैसर्गिक रित्या तलावात उगवणार्‍या या कांद्यात भरपूर जीवनसत्व असतात या कांद्यावर संशोधन झालं तर शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय उपलब्ध होऊ शकतो. मूल तालुक्यातील बोरचांदली तलावात हे कचर कांदे सद्यस्थितीत उपलब्ध असून तेथीलच  मजुरांनी जिल्ह्यात 46 अंश सेल्सियस तापमानात सुद्धा लहानशी टोपली घेऊन उकडलेले कचरकांदे बस स्थानकाच्या समोर विकायला बसतात. 
    उन्हाळ्याच्या दिवसात हमखास बस स्थानक परिसरात कचरकांदे मिळतात. खायला तितकीच रुचकर असल्याने ग्राहकांची त्याला पसंती आहे. यातून काही मजुरांना तुटपुंज्या का होईना मात्र रोजगार उपलब्ध झाला आहे.
     नैसर्गिकरित्या तलावात कच्चर कांदे उगवतात. तलाव आटला की जमीन खोदून कांदे काढले जातात. व ती स्वच्छ धुऊन उकडवली जातात. व विक्रीस मूल बस स्थानक परिसरात आणली जातात, त्यामुळे मूल शहराच्या बसस्थानकावर कचरकांदे हमखास मिळतात.
     
प्रतिक्रिया
कचर कांदे हे आमच्या गावच्या बोरचांदली तलावात असून त्याला खोदून उकडून मुले ते विकायला आणतो त्यातून शे दोनशे रुपये रोजी मिळते घरचा उदरनिर्वाह चालवायला मदत होत आहे.
     नथू सोपंकार, (बोरचांदली ) कचर कांदे विक्रेता

Post a Comment

0 Comments