Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे सहज संगीत व आत्मसाक्षात्कार सोहळा, संगीतकार डॉ. राजेश युनिवर्स हरियाणा यांची उपस्थिती.

मूल येथे सहज संगीत व आत्मसाक्षात्कार सोहळा, संगीतकार डॉ. राजेश युनिवर्स हरियाणा यांची उपस्थिती.

मूल (अमित राऊत)

मूल शहरात परमपूज्य श्री माताजी श्री निर्मलादेवी प्रणीत सहजयोग ध्यान साधना तर्फे सहजसंगीत आणि आत्मसाक्षात्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन 24 मे मंगळवारला गुजरी चौक येथे करण्यात आले आहे.

दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सहज रॅली काढण्यात येणार आहे. सायंकाळी 6 ते 7.30 पर्यंत आत्मसाक्षात्कार सोहळा होणार आहे. त्यानंतर 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत सहज संगीतमय सोहळ्याचे आयोजनाची रूपरेषा ठरविण्यात आली आहे.

सहजयोग संगीतमय सोहळ्याला हरियाणा येथील संगीतकार डॉ. राजेश युनिवर्स यांच्या उपस्थितीत संगीत सोहळा होणार आहे.

या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन सहयोग ध्यान साधना केंद्र मूल तर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments