Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

ब्रेकिंग न्यूज ...पोलीस नक्षली चकमकीत एक जवान जखमी

 

बीजापूर - छत्तीसगड येथे झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत आज कोब्रा बटालियनचा एक हेड कॉन्स्टेबल जखमी झाला, त्याला फील्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बस्तर रेंजचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी सांगितले की, जिल्हा राखीव पोलीस दल, छत्तीसगड आर्म फोर्स आणि कोब्रा यांची संयुक्त दल बासागुडा पोलीस स्टेशन क्षेत्रातील पायगडपल्ली कॅम्प येथून कोट्टागुडाकडे रवाना झाली होती. आज दुपारी कोटागुडा आणि पेगडापल्ली दरम्यान कोब्रा बटालियन आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 210 कोब्रा बटालियनचा जवान हेड कॉन्स्टेबल संजू कुमार यांच्या पायाला दुखापत झाली. जखमी जवानाला फील्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments