Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

1 करोड 74 लाख नविन नळ योजना मंजूर, भेजगाव पाण्याची समस्या सुटणार

1 करोड 74 लाख नविन नळ योजना मंजूर
भेजगाव पाण्याची समस्या सुटणार

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भेजगाव येथे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत एक करोड 74 लाख रुपये खर्चून नवीन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होणार असल्याने भेजगाव वासियांना तहान भागविण्यास नव संजीवनी मिळणार आहे.
  सध्या स्थितीत पाण्याचा तुटवडा जाणवू लागला असल्याने महिलांमध्ये नाराजी आहे. जिल्हा परिषदेचे स्वतंत्र प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. मात्र या योजनेला जवळपास 40 वर्षाचा काळ झाल्याने पाण्याची टाकी जीर्ण झाली आहे. कधीही कोसळण्याच्या स्थितीत असल्याने तिला साफ करता  येत नाही परिणामी तिच्यात गाळ साचून तिची साठवण क्षमताही कमी झाली आहे.
      असे असले तरी चाळीस वर्षे जुन्या टाकीची क्षमता कमी असून व नळ कनेक्शन ही वाढले असल्याने पाणी कमी पडते आहे.व ती सध्या स्थितीत निर्लीखीत झाली आहे. परिणामतः बोरचांदली व एकोणवीस गावात करीत असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या टाकीतून भेजगाव वासियांची तहान भागवण्यास मदत होत आहे. असे असले तरी 
टाकीची क्षमता कमी असल्याने पाण्याचा तुटवडा जाणवतो आहे. परिणामतः दोन टप्प्यात पाणीपुरवठा ग्रामपंचायतीला करावा लागत आहे.
      मात्र ही समस्या आता कायमची सुटणार असून शासनाच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत भेजगाव येथे एक करोड 74 लाख रुपये मंजूर झाले असून सदर कामाची निविदा सुद्धा झाली आहे. काही दिवसातच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याने त्यांचे पाणी समस्या सुटणार आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
     
प्रतिक्रिया
नवीन नळ योजना मंजूर झाली असून ती पुर्णत्वास आल्यास गावातील पाणी समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
अखिल गांगरेड्डिवार ,सरपंच भेजगाव

Post a Comment

0 Comments